Ad will apear here
Next
पवन सिंह यांची आयएसएसएफच्या पंच समितीमध्ये निवड
समितीमध्ये स्थान मिळविलेले पहिले भारतीय
पवन सिंहपुणे : भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव, भारतीय नेमबाजीच्या संघाचे माजी प्रशिक्षक आणि पुण्यातील गन फॉर ग्लोरी या शूटिंग अकादमीचे सहसंस्थापक पवन सिंह यांची इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएसएफ) पंच समितीमध्ये निवड झाली आहे. या महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान मिळविलेले पवन सिंह हे पहिले भारतीय आहेत. 

जर्मनीतील म्युनिच येथे सात सदस्यांच्या या समितीसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात २२ देशांतील उमेदवार रिंगणात होते. यात भारताच्या पवन सिंह यांनी बाजी मारली. या समितीच्या निवडीसाठी आयएसएसएफच्या प्रशासकीय परिषदेच्या सदस्यांनी मतदान केले. आयएसएसएफची ही निवडणूक दर चार वर्षांनी घेण्यात येते.

याआधी दोनच दिवसांपूर्वी आयएसएसएफच्या उपाध्यक्षपदी एनआरएआयचे सध्याचे अध्यक्ष रनिंदर सिंह यांची निवड करण्यात आली होती.

इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनची ही पंच समिती सात सदस्यांची असून, जागतिक पातळीवरील नेमबाजीचे एकसमान नियम, आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचांना लागू होणारे नियम व मार्गदर्शक तत्त्वे, अभ्यासक्रम याबरोबरच पंचाना आवश्यक असलेल्या परवान्यांचे अर्ज आदी गोष्टींवर मुख्यत: नियंत्रण ठेवते. याबरोबर वर्षातून किमान एकदा फेडरेशनच्या प्रशासकीय परिषदेला अहवालदेखील सादर करते.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZYNBV
Similar Posts
टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी पंच म्हणून पवन सिंह यांची निवड पुणे : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सहमहासचिव पवन सिंह हे ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धांमधील पहिले भारतीय पंच ठरणार आहेत. सिंह यांची टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२० साठी नेमबाजी पंच म्हणून निवड झाली आहे.
गगन नारंग फाउंडेशनतर्फे नेमबाजी पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुणे : नेमबाजी या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळावे आणि उत्तम नेमबाज खेळाडू व प्रशिक्षकांबरोबर नेमबाजी पंचांचीही फळी भारतात तयार व्हावी या उद्देशाने गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनतर्फे (जीएनएसपीएफ) रायफल-पिस्टल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारांसाठी ‘आयएसएसएफ बी- कोर्स’ हा पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे
‘स्वार्थासाठी खेळू नका’ पुणे : ‘शालेय जीवनात केवळ २५ गुणांच्या उद्देशाने खेळात सहभागी होऊ नका. खेळ नि:स्वार्थ वृत्तीने खेळा. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड द्या. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघण्याचे ध्येय उराशी बाळगा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. स्वार्थासाठी खेळाची निवड केली, तर क्रीडाक्षेत्रात कारकीर्द
डीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन पुणे : नेमबाजी क्रीडाप्रकाराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘डीएक्स आर्चरी अॅकॅडमी’ची दुसरी शाखा बावधन येथे सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language